Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Video : BVG चा मालक सरकारचा जावई आहे का ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई 21 फेब्रुवारी –  ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा राज्यात ऍम्ब्युलन्स सेवा पुरवण्याचे कंत्राट दिल्याने BVG कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का ? नाना पटोले यांचा संतप्त सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे असा आरोप देखील त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रासह देशभरात शासकिय ऍम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या BVG कंपनीला देशभरातील ७ राज्यांनी ब्लॅकलिस्ट केले आहे, या कंपनीला काम देऊ नये असे आदेश आहेत. BVG कडे जुन्या व कालबाह्य झालेल्या ऍम्ब्युलन्स आहेत. कोरोना काळात या कंपनीला मुदतवाढ दिली होती, त्यानंतर नवीन टेंडर काढून दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्यायला पाहिजे होते परंतु महायुती सरकारने पुन्हा BVG ह्याच कंपनीला कंत्राट दिले आहे. BVG कंपनीवर एवढी मेहरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्न विचारत या ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.