Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिनागुंडाच्या राजीरप्पा धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

पर्यटनाचा आनंद घेण्यास गेलेल्या धबधब्यात खोल पाण्याचा अंदाज तसेच पोहता येत नसल्याने मेव्हण्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावजीचा देखील बुडून मृत्यू..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, ता. ११: भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा येथे कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा राजीरप्पा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. बादल श्यामराव हेमके (३९) रा. आरमोरी आणि नवनीत राजेंद्र धात्रक (२७) रा. चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.

नवनीत धात्रक हा बादल हेमके यांचा मेहुणा(साळा )आहे. हेमके हे भामरागड तालुक्यातील पर्ल ग्रामपंचायतीचे ग्रामसवेक आहे.त्यामुळे त्यांचे वास्तव भामरागड येथे आहे. ७ जूनला नवनीतचे लग्न झाल्याने राज्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या बिनागुंडाचा
राजीरप्पा धबधबा तसेच लगत असलेल्या अबूझमाड परिसरातील निसर्गाने मुक्त उधळण केली असल्याने हा भाग नागरिकांना नैसर्गिक आकर्षणाचा केंद्र आहे तर दुसरीकडे त्यात बाराही महिने वाहणारा राजिरप्पा धबधबा भर घातल्याने येथील नैसर्गिक वातावरण पर्यटकांच वैभव आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळेच भामरागड तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नवनीत धात्रक नवदाम्पत्य  हेमके यांच्या घरी गेला. चंद्रपूर जिल्ह्यातील नवनीत धात्रक पत्नी मयुरी धात्रक,ताई नेहा बादल हेमके व मुलगी तसेच त्याचा मित्र नानू साळवे त्याची पत्नी आणि छोटासा मुलगा असे ७ जण १० जून रोजी भामरागडात दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास तालुका मुख्यालयातील पर्यटन स्थळांना भेट देऊन रात्री नवनीत धात्रक याचा भाटवा बादल हेमके यांच्याकडे मुक्काम करून सकाळी बादल हेमके,पत्नी नेहा आणि मुलगी, मेहुणा  नवनीत धात्रक, पत्नी मयुरी धात्रक आणि मित्र नानु साळवे,त्याची पत्नी आणि मुलगी असे ८ जण ताडगाव येथील चारचाकी वाहन भाड्याने घेऊन बिनागुंडा गाठले.

बिनागुंडा येथील धबधबा पाहण्यासाठी गेले. त्यावेळी पोहण्याचा मोह आवरला नाही लगेच  नवनीत आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी हेमके हे मदतीला धावले. मात्र, दोघांनाह पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोघांच्याही कुटुंबीयांच्या समक्ष र्ह हृदयद्रावक घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाहेरी येथील पोलिसांन घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी  आणण्यात आले. लग्नाला चार दिवस होत नाही; तोच पतीने प्राण गमावल्याने पर्न गावात  शोकविव्हळ झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 बिनागुंडा येथील राजीरप्पा धबधब्यात वैद्यकीय अधिकाऱ्याचाही झाला मृत्यू

भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले नागालँड राज्यातील मुळचे रहिवासी  डॉ. आर एल जामी हे बिनागुंडा येथील राजीरप्पा धबधबा पाहण्यासाठी १६ एप्रिल २०१७ रोजी सर्व अधिकारी कर्मचारी गेलेहोते .त्यावेळी धबधब्याच्या  पाण्यात आंघोळ करीत असताना डॉ आर एल जामी हे खोल पाण्यात गेले.त्यानाही पोहता आले नसल्याने  त्यांचाहि  बुडून मृत्यू झाला होता. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने धबधब्याभोवती  लोखंडी कटघारे लावण्याची मागणी स्थानिक नागरिकाकडून केली जात आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.