Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जनसामान्यांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवा :- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

सिंदेवाही येथे आढावा बैठक - विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 12 जुन – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील सिंदेवाही तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पुर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडवा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथिल विश्राम गृह येथे आयोजित सभेत दिले.

यावेळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी व शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत भवन इमारत बांधकाम, पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागा अंतर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग,तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, कंत्राटदारांनी केलेल्या चुका, झालेले शेतकर्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रं आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नुकतीच आटोपलेल्या लोकसभा निवडणुक कार्य्रमाअंतर्गत लागू असलेली आचारसंहीता यामुळे विकास कामे ठप्प पडली होती. तर येणारा हंगाम हा पावसाळी हंगाम असुन यातुन सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक यांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवीण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पुर्ण करावे. तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष्य करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय केल्या जाणाऱ्या नाही अशी तंबी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने संबंधित विभागाचे सर्व अधिकारि, नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजित आढावा सभेस सिंदेवाही तहसीलदार पानमंद, गटविकास अधिकारी सुकरे,वैद्यकीय अधिकारी झाडे, पोलिस निरीक्षक तुषार चव्हान,काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, काँग्रेस शहराध्यक्ष सुनिल उट्टलवार नगराध्यक्ष स्वप्नील कावळे,विरेंद्र जयस्वाल,राहुल पोरेडीवार,महीला आघाडी अध्यक्ष सिमा सहारे, सरपंच राहूल बोडणे,नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते,तथा सर्व विभागाचे अधिकारी व सरपंच तसेच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.