Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हल्का पाऊस, वारा आला, तरी बत्ती गुल…

चिंतलपेठ गावातील कधी सुटणार वीज समस्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रतिनिधि: विठ्ठल तेलसे

अहेरी, 8 जुलै: अल्लापल्ली येथे ३३ आणि १३२ केव्हीं चे उच्य दाबाचे सब स्टेशन आहे. या सब स्टेशन मधून अहेरी उपविभागात विद्युत पुरवठा केला जातो. मात्र याच उच्च दाब केंद्रापासून चिंतलपेठ हे गाव १४ किमी अंतरावर आहे. तरीही वारंवार विद्युत खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अल्लापल्ली पासून ते चिंतलपेठ पर्यंत वीज वितरण कंपनीने विद्युत महामार्गालगत दिली आहे. त्यामूळे पाहिजे तसे मोठे वृक्ष कुठेही नसताना अल्पसा वादळ वारा आला तरी विद्युत खंडित होत असून तासंतास वीज कर्मचारी सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याने गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चिंतलपेठ गावातील जागरूक सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा वीज खंडित झाल्यास भ्रमध्वनीद्वारे तर कधी लेखी  तकरार आलापल्ली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात देऊन ही वीज कर्मचारी अक्षम्य गाव खेड्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अल्पसा हवा, पाऊस जरी आला तरी कधी चार तास तर कधी पूर्ण दिवसच लाईन बंद असते. कितीही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांना काल केला असता फोन उचलत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वीज वितरण कंपनीकडून घरगुती विद्युत बिल भरण्यासाठी अल्पसाहि विलंब झाला तर विद्युत खंडित करण्यासाठी येतात. मात्र जेव्हा समस्या निर्माण होतात.अथवा कार्यालयात जाऊन समस्येचे निराकरण करण्यासाठी गेले असता अरेरावीची भाषा करीत असतात. आधीच गावात कित्येक दिवस विद्युत खंडित असतो तरीही वीज बिल मोठ्या प्रमाणात येत आहे . खेड्यापाड्यात शहराप्रमाणे वीज उपकरणे वापरत नाही. अश्या परिस्थितीत कार्यालयीन वेळेत कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतातच मग येत पर्यंत त्या कर्मचारी अधिकारी यांची वाट बघत राहावं लागत.

एखाद्या वेळी कर्मचारी उपस्थित असतील तर बिलाची दुरुस्ती असेल अथवा समस्या असेल कार्यालयातच उडवा उडवी ची उत्तरे देवून खेड्यापाड्यातून दूरवरून येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन न करता उलट मान अपमान करून आलेल्या पावलाने परत जावं लागत असल्याने मोठी समस्या निर्माण होताना दुसून येत आहे.

चिंतलपेठ गावातील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून अल्लापल्ली येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती अवगत करून देण्यात येत आहे. तरीही वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी खंडित विद्युत चालू करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या मनमर्जी च्या कामामुळे त्रस्त होऊन आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला विचार सुरु आहे.

निरंजन दुर्गे
पोलीस पाटील चिंतलपेठ

वेळोवेळी विद्युत खंडित राहू नये यासाठी गावातील युवा स्वतः झाड झुडप कापतात. कधीही वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ देत नाही. मात्र वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मदत करतात. तरीही विद्युत खंडित झाल्यावर तक्रारीनंतर दुर्लक्ष करत असेल सांगूनही तर काय करावे हा प्रश्न निर्माण झाल्याने शेवटी संपूर्ण गावच वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा करण्याचां पवित्रा घेतला आहे.

Comments are closed.