Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे जॉब प्लेसमेंटचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 15 जुले – प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ प्रयत्नशील असून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी कायमच विद्यार्थ्यांच्या कौशल्याधारीत शिक्षणावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करुन शिक्षण दिल्यास तो रोजगाराभिमुख होईल व त्याचे जीवनमान उचांवण्यास मदत मिळेल.

गोंडवाना विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलद्वारे शनिवार, दि. 13 जुलै 2024, रोजी विद्यापीठ सभागृहात जॉब प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमात पुणे येथील मल्टीनॅशनल बेकर्ट लिमीटेड कंपनीतर्फे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये 123 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 31 विद्यार्थ्यांची प्राथमिक स्वरुपात निवड करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फक्त शिक्षणाचा दर्जा उंचावणे हाच हेतू न ठेवता, त्यांना रोजगार मिळायला हवा या उद्देशाने जॉब प्लेसमेंट उपक्रम विद्यापीठात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून येथील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

यावेळी विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध गचके, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. उत्तमचंद कांबळे, पदव्युत्तर शैक्षणिक रसायनशास्त्र विभागाचे प्लेसमेंट ऑफीसर डॉ. केशब बैरागी, तसेच रसायनशास्त्र विभागाचे डॉ. स्नेहा वनकर, डॉ. सुषमा बनकर, डॉ. प्रशांत ठाकरे तसेच कंपनीचे व्यवस्थापक सुनील चौहान, अमोल बोचरे विशाल खोट, अकुंश दौंडकर आदी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.