Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणाचा समारोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर,16 जुलै – जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे सत्र 2024-25 मधील 1 ल्या बॅचचा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा निरोप कार्यक्रम तसेच नौकरी प्राप्त उमेदवाराचा सत्कार घेण्यात आला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रदिप काठोळे तसेच जिल्हा तक्रार आयोगाचे सदस्य सचिन जैस्वाल उपस्थित होते. या केंद्रातील माजी प्रशिक्षणार्थी सुप्रिया दोडके ह्या पोलिस शिपाई म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून रुजू झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच साडेतीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी प्रदीप काठोळे म्हणाले, मुलांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा. तसेच मोठे स्वप्न बाळगून आपल्या ध्येयापर्यंत पोहचावे. सचिन जयस्वाल यांनी, शासकीय नौकरीत येण्यासाठी प्रयत्न करा आणि आपण समाजाचे देणे लागतो, हा भाव मनात ठेवा, असे सांगितले. तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे म्हणाल्या, मिळालेल्या संधीचे सोनं करा, पण अपयश आल तर अ व ब असे दोन प्लॅन तयार ठेवून त्याला कौशल्याची जोड द्या. जेणेकरून आपण भविष्यात रोजगारक्षम होऊ, असे मार्गदर्शनात त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समारोपीय कार्यक्रमात साडेतीन महिन्याचे कालावधीत शिकवलेल्या अभ्यासावर अंतिम परिक्षा घेण्यात आली व त्यात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांकाच्या प्राविण्यप्राप्त उमेदवारांना बक्षिस देवून प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी केले. संचालन साक्षी टेकाम व प्राची वेट्टी यांनी तर आभार बबली धारणे यांनी मानले. यावेळी गौरकार, तीरणकर, तोडासे, डोंगरे मॅडम यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.