Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी – एका वरिष्ठ जहाल महिला माओवादी कॅडरने केले गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 27 जुलै – नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला जहाल महिला माओवादी नामे रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफंुडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. 2006 मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती. शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयाचे बक्षिस होते.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करतात  प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही. नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते. वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात. दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही. गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.