Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकविध क्रीडा संघटनांनी नोंदणी करावी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31 जुले – जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा एकविध क्रीडा संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने करावयाचे असल्याने जिल्ह्यातिल विविध खेळाच्या एकविध जिल्हा संघटनांनी जिल्हा क्रीडा कार्यालयात संघटनेचे अधिकृत दस्तऐवज सादर करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
शालेय क्रीडा स्पर्धासाठी मान्यताप्राप्त 93 खेळांची यादी :-
आर्चरी, ॲथलेटिक्स, क्रॅासकट्री, बॅडमिंटन, बॉलबॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कॅरम, बुध्दीबळ, क्रीकेट, सायकलींगरोडरेस, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स (रिदमिक), जिम्नॅस्टिक्स (ॲक्रोबॅटिक्स), हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, कीक-बॉक्सींग, लॉनटेनिस, मल्लखांब/रोपमल्लखांब, नेहरुकपहॉकी, नेटबॉल, रायफलशुटिंग, रोलबॉल, रोलरस्केटिंग, रोलरहॉकी, शुटींगबॉल, सिकईमार्शलआर्ट, सॉफ्टबॉल,स्क्वॅश,सुब्रतोकपफुटबॉल,जलतरणवडायव्हिंग, वाटरपोलो, टेबलटेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, कुस्तीफ्रीस्टाईल/कुस्तीग्रीकोरोमन, वुशू, योगासन, रग्बी, मॉडर्नपेंटॅथलॉन, सेपकटकरा, सॉफ्टटेनिस, टेनिक्वॉईट, आट्यापाट्या, आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल क्रिकेट,मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो बॉक्सींग,रोप स्किपींग, सिलबम,वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग त मार्शल आर्ट, कुरश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुन दो, फुटसाल, कॉर्फबॅल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट.

Comments are closed.