Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिष्यवृत्तीकरीता महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागा अंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजने अंतर्गतअनुसुचित जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्याकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन/ नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे.

महाविद्यालयांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करुन घ्यावी. महाडिबीटी प्रणालीवर मार्गदर्शक तत्वे व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेचे नियमांबाबत सविस्तर माहितीसाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालक वर्ग यांनी https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या संकेतस्थळाला भेट द्यावी.
सदर योजनेच्या अटी व शर्ती शासन निर्णयानुसार लागु राहील. दिनाक २५ जुलै २०२४ पासून महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी सुरु झाली असुन जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.