Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल !

राणा यांच्या वादग्रस्त विधानावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची केली खरडपट्टी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोलले आहेत. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे काय? असा संतप्त सवाल करत राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा असल्याने सरकारने बहिणींची माफी मागावी अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची खरडपट्टी केली आहे.

आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आज सरकारचा खरपूस समाचार घेतला.
वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेत आहेत. यांना दोन वर्षापूर्वी बहीण आठवली नाही. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. त्याबद्दल सरकार बोलत नाही. आता मतासाठी फसव्या योजना आणल्या जात आहेत. राज्य चोरांचे झाले आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू आहे. कमिशनखोरी ४० टक्केवर गेली. बेरोजगारी वाढली आहे. उद्योग गुजरातला गेले आहेत. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे. शेतकऱ्यांना १५ हजार कोटी रूपये दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.प्रत्यक्षात मात्र ४६०० कोटी रूपये दिले. एक नंबरचे राज्य अकराव्या नंबर वर नेवून ठेवले. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. सत्ताधाऱ्यांमध्ये टक्केवारीवरून शित युद्ध सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वडेट्टीवार म्हणाले की, आदरणीय विलासराव देशमुख म्हणायचे काँग्रेस हा देशाचा विचार आहे. आज राष्ट्रीय नेते राहूलजी गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस भरारी घेत आहे. लोकसभेत मराठवाड्यात काँग्रेसला यशा मिळाले आहे. लोकसभेत यश मिळालं म्हणून शांत बसू नका. विधानसभेत देखील भरघोस यश मिळवायचं आहे. असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

१४ ऑगस्टला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार , त्वचाविकार व सिकलसेल ओपीडी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.