Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजस्थानात भाजपचा काँग्रेसला ‘दे धक्का’, पाच मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा, तर पाच जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जयपूर, दि. ९ डिसेंबर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जादू ओसरल्याचे चित्र पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसले. राज्यातील पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून विरोधी पक्ष भाजपने शानदार कामगिरी केली. राजस्थानातील 21 जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिली. गेहलोत कॅबिनेटमधील पाच नेत्यांच्या जिल्ह्यातही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राजस्थानात एकूण 4 हजार 371 पंचायत समितींच्या निवडणुका झाल्या. यापैकी भाजपने 1 हजार 911 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 1 हजार 780 जागा खिशात घालता आल्या. याशिवाय 425 पंचायतींमध्ये अपक्षांनी विजय मिळवला. आरएलपीने 56, माकपने 16, बसपने तीन, तर राष्ट्रवादीने एका पंचायत समितीवर झेंडा रोवला.

दुसरीकडे, जिल्हा परिषदांच्या 636 जागांवर निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने 353 जागा जिंकल्या, तर काँग्रेस 252 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. आरएलपी 10, तर 18 अपक्षांनी जिल्हा परिषदेत जागा पटकावल्या आहेत. भाजप 14 जिल्हा परिषदांमध्ये आपला अध्यक्ष बसवण्यात यशस्वी ठरली, तर केवळ पाचच जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नड्डांकडून शेतकरी-महिलांचे आभार

नागौर जिल्ह्यात हनुमान बेनीवाल यांचा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तर डुंगरपूरमध्ये बीटीपीच्या हातात जिल्ह्याध्यक्षपद निवडण्याची ताकद आहे. पंचायत निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुभेच्छा दिल्या.

गेहलोतांच्या मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेस पराभूत

भाजप अजमेर, जालौर, झालावाड, झुंझुनू, पाली, राजसमंद, बाडमेर, भीलवाडा, बूंदी, चितौडगढ, चुरु, सीकर, टोंक आणि उदयपूर या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष बनवण्यात यशस्वी ठरली आहे. तर बांसवाडा, भीलवाडा, प्रतापगढ, हनुमानगढ आणि जैसलमेर जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा अध्यक्ष असेल.

पायलटांच्या मतदारसंघातही काँग्रेसला धक्का

अशोक गेहलोत कॅबिनेटमधील रघु शर्मा यांच्या अजमेर, उदयलाल आंजना यांच्या निंबाहेडा, गोविंद डोटासरा यांच्या लक्ष्मणगढ आणि क्रीडा राज्यमंत्री अशोक चांदना यांच्या हिंडौली जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव झाला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या टोंक आणि गेहलोत यांचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी यांच्या नावा मतदारसंघातही काँग्रेला पराभवाचा धक्का बसला.

दिग्गज नेत्यांचे नातेवाईक हरले

केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांचे पुत्र रवीशेखर बिकानेर जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत पराभूत झाले. सादुलपुर काँग्रेस आमदार कृष्णा पुनिया यांच्या सासूबाई आणि भावजय पंचायत समिती सदस्य निवडणुकीत हरल्या. सरदारशहरचे काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांची पत्नी मनोहरीदेवी शर्मा यांना अपक्ष रिंगणात उतरलेले दीर श्यामलाल शर्मा यांनीच पराभूत केले.

भाजप आमदार गोपीचंद मीणा यांच्या मातोश्री उगमा देवी यांचा हाजपूर पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला. गढीमधील भाजप आमदार कैलाश मीना यांच्या सूनबाईही पराभूत झाल्या. श्रीमाधोपूरचे माजी आमदार झाबर खर्रा यांचे पुत्र दुर्गा सिंह आणि काँग्रेसचे माजी आमदार कांता भील यांचे पुत्र अरथुनातून निवडणूक हरले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.