Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिणे लंपास; गोव्याला गेले पर्यटनासाठी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ९ डिसेंबर : गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या नागपुरातील रेड्डी कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधत कपाटात ठेवलेले हिरे, सोन्याचे दागिणे व रोख ४७ हजार रुपये असा  ३० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमालवर हात साफ केले.सोनेगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिमापुरम गुणशंकर रेड्डी (६१) रा. परफेक्ट हाउसिंग सोसायटी, पन्नासे ले-आउट, यांचा गोडाऊनचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबासह ३ डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून गोवा येथे फिरायला गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी अलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने, हिरे आणि रोख ४७ हजार रुपये असा एवूâण ३० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गोव्याच्या टूरवरून मंगळवारला परत आलेल्या रेड्डी कुटुंबाला सामान अस्तव्यस्त पाहून घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आलमारी बघितली असता हिरे, सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम आढळून आली. एवढा मोठा मुद्देमाल चोरी झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. सिमापुरम रेड्डी यांनी सोनेगांव पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.