Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी

मतदान केंद्रांचा घेतला आढावा : सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत दिल्या सूचना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला.
चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत, कुरूड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत, तळोधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तसेच चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील मतदान केंद्रांना भेटी देऊन सोयी सुविधा व स्वच्छतेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.तसेच राजेंद्र कुमार कटारा यांनी चामोर्शी-मुल मार्गावरील हरणघाट येथील स्थिर निगराणी पथक, गडचिरोली -चंद्रपूर मार्गावरील पारडी नाका येथील स्थिर निगराणी पथकाला भेट देऊन सदर नाक्यावरील वाहन तपासणी बाबत आढावा घेतला.

आचारसंहिता व निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून योग्य प्रकारे वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी) अमित रंजन , गडचिरोलीचे नायब तहसीलदार हेमंत मोहरे,चामोर्शीचे नायब तहसीलदार गिरीश नरोटे, सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचे संपर्क अधिकारी तथा उपविभागीय अभियंता संजय भांडारकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.