Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सराफा मार्केटमध्ये 5 नोव्हेंबर पासून सोन्याची किंमत 3500 रुपयांनी घसरली आहे.

सोन्याचा भाव आला 75 हजार रुपयांच्या घरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झालेली असल्याने त्यांनी  राष्ट्र प्रथम हा त्यांचा नारा  दिलेला आहे. त्यांच्या विजयानंतर डॉलर इंडेक्समध्ये तुफान तेजी  दिसून येत आहे. त्याचा परिणाम थेट जागतिक बाजार तसेच भारतीय बाजारावर दिसत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 5 नोव्हेंबर नंतर 4.44 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. या दिवशी बाजार बंद होताना सोन्याचा दर 78,507 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत जवळपास 3,500 रुपयांची घसरण दिसली. मंगळवारी सोन्याची किंमत MCX वर 75,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरली. तर जागतिक बाजारात सोने 5 टक्क्यांनी खाली उतरले. तज्ज्ञांच्या मते, डॉलर निर्देशांक या वर्षाच्या अखेरपर्यंत 107 वर पोहचेल. ट्रम्प यांनी युक्रेनसह रशियाला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्याचा ही परिणाम सराफा बाजारावर झालेला आहे.

gold and silver rate

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोन्याच्या किंमतींवर डॉलरच्या तेजीचा थेट परिणाम दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर मजबूत स्थितीत आला आहे. जागतिक आणि भारतीय बाजारात सध्या मागणी वाढण्याची शक्यता कमी आहे. तसेच  जागतिक बाजारातील घाडमोडींमुळे सोन्याचा भाव कमी होत आहे. डॉलर इंडेक्स 2.21 टक्क्यांनी वधारला असून ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकन व्यापारी आणि औद्योगिक जगताला नवीन भरती आली आहे. आगामी काळात डॉलर निर्देशांक अजून मजबूत होण्याचा अंदाज आहे. सध्या डॉलर निर्देशांक 105.71 स्तरावर आहे. तो लवकरच 106.52 या उच्चांकी स्तरावर पोहचण्याची  शक्यता आहे  त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळे सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे.

gold rate

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.