Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर लिपिक एसीबीच्या सापळ्यात; दीड लाखांची केली मागणी 

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरला रात्री ताब्यात घेतले,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क,

विकी प्रधानने स्वतःच्या लग्नावेळी कंत्राटदाराकडून ५० हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारले होते. त्यानंतर ४ हजार रुपये स्वीकारले. उर्वरित ९६ हजारांची मागणी केली. पडताळणीत त्याने स्वतःच ही बाब मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

गडचिरोली : सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून घेण्यासाठी कंत्राटदाराकडून बिल काढून दिल्याबद्दल  दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ५४ हजार रुपये स्वीकारणाऱ्या व उर्वरित ९६ हजारांची फोनवरून मागणी करणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरला रात्री ताब्यात घेतले, विकी भास्कर प्रधान (३०) असे त्या लिपिकाचे नाव आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तक्रारदार हा सफाई कंत्राटदार असून, त्याने पोलिस ठाणे, मुख्यालय आदी ठिकाणच्या सेप्टिक टाक्यांच्या सफाईचे काम घेतले होते. याचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात इमारत शाखेचा लिपिक विकी प्रधान याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. आधी दोन टप्प्यांत ५४ हजार रुपये स्वीकारले व उर्वरित रकमेपैकी दहा हजार रुपये आणून दे, अशी मागणी फोन करून केली. शिवाय, राहिलेल्या पैशांची नंतर व्यवस्था करून दे, अशी मागणी केली. यासंदर्भात २४ ऑक्टोबरला कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्याच दिवशी एसीबी पथकाने पडताळणी केली असता, पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ८ नोव्हेंबरला सापळा लावला, पण संशय आल्याने विकी प्रधानने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ रोजी विकी प्रधान यास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, अंमलदार सप्नील बांबुर्डे, संदीप घोनमोडे, संदीप उडाण, राजेश पद्मगीरवार, ज्योत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, राजेश्वर कुमरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

हे देखील वाचा,

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.