Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२१ नोव्हेंबरला सर्च दवाखान्यात मधुमेह (डायबेटीस/शुगर) विकार आरोग्य तपासणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात  दिनांक- २१ नोव्हेंबर रोजी  मधुमेह (डायबेटीस/शुगर) विकार आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आलेले असून नागपूरचे सुप्रसिद्ध मधुमेह विकारतज्ञ डॉ. संकेत पेंडसे हे ओपीडीमध्ये तपासणी करिता येणार आहेत. खूप तहान लागणे, नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, सारखे काही इन्फेक्शन होणे, दृष्टी कमी होणे, कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे ही मधुमेहाच्या आजाराची लक्षणे आहेत. ज्या रुग्णांची रक्तातील साखर(शुगर) वाढलेली आहे. अशी लक्षणे आढळल्यास मधुमेह आजार ओपीडी मध्ये मधुमेह विकारतज्ञ  आरोग्य तपासणी करतील. येताना आपले जुने रिपोर्ट्स आणावे व शुगर तपासणीसाठी उपाशीपोटी यावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

        गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी  गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये  ईसीजी, एक्सरे,  प्रयोगशाळा तपासणी,तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०%  सवलत प्रदान करित आहे.  विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. तरी २१ नोव्हेंबर  रोजी होणार्‍या  मधुमेह विकार ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.