Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गृहमंत्र्यांच्या नावाखाली भाजपने विरोधी पक्षांचा प्रचारात आणली बाधा : भाजप उमेदवारावर गुन्हे दाखल करा

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे आयोजन गडचिरोली शहरात केले असल्याचे सांगून आज रविवारी सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अति महत्वाची व्यक्ती म्हणून बंदोबस्त आवश्यक असला तरी प्रचारासाठी एकच दिवस बाकी असताना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाखाली दुपारी १२ वाजता पर्यंत शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी जाणून बुजून अडचण निर्माण करण्यात आली. अधिकृत प्रचार कार्यालयात येणे जाणे करण्यास आणि परवानाधारक वाहनांना शहरात आपला प्रचार करण्यासाठी अडचण निर्माण केली गेली. हे सत्तेचे दुरुपयोग असून आमच्या उमेदवाराच्या प्रचारात बाधा आणण्यास जबाबदार असलेल्या भाजप उमेदवारावर निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केली आहे.

उल्लेखनीय की, भाजप – काॅंग्रेसच्या गटबाजीला कंटाळलेल्या जनतेने आता शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांना मिळत असलेल्या वाढत्या जनसमर्थनाचा धसका भाजप – काॅंग्रेसने धसका घेतला असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.