Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भा.ज.पा. अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. १० डिसेंबर: पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भा.ज.पा. अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भा.ज.पा. चे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

२०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला असून दगडफेक करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत आहे. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचं दिसत आहे. व्हि.डी.ओ. मध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“बंगाल पोलिसांना जे. पी. नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई डेस्क, दि. १० : भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या गाडी वर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे. या हल्ल्यात भाजप नेते कैलास वर्गीय यांच्या हाताला मार लागला असून या हल्ल्याचा रिपाइं तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे.

पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस ची सत्ता लवकरच जनता उलथवून लावणार आहे.त्यामुळे पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस दादागिरी वरून येऊन विरोधी पक्षावर दबाव टाकत आहे.लोकशाही मध्ये अशा हिंसक कारवाया करणे लोकशाही विरोधी आहे.तृणमूल काँग्रेस च्या या भ्याड हल्ल्याचे तेथील जनता आगामी निवडणुकीत योग्य उत्तर देईल. पश्चिम बंगाल ची जनता ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावणार असल्याने ममता बॅनर्जी यांच्या पक्षातून हिंसक हल्ला होत असल्याचा आरोप ना रामदास आठवले यांनी केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.