Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भारत सरकारने ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ हा उपक्रम पुढील वर्षी होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ हजार तरुण-तरुणी १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताबाबत त्यांची संकल्पना सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे,त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताची त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या आणि प्रसिद्ध जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांशी जोडणे आणि विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांना सक्षम करणे, असा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

४ टप्प्यात होणार निवड-
विकसित भारत यंग लीडर्स चर्चासत्रच्या माध्यमातून या तरुणांची ४ टप्प्यांत निवड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, विकास भारत प्रश्नमंजुषा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल, ज्यामध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक MYBharat.gov.in पोर्टलवर नोंदणी करून भाग घेऊ शकतात. पहिल्या टप्प्यात निवडलेले तरुण दुसऱ्या टप्प्यातील विकसित भारत ब्लॉग/निबंध स्पर्धेत सहभागी होतील. या टप्प्यातील निवडक युवक तिसऱ्या टप्प्यातील विकसित भारत राष्ट्रीय पिच डेक-स्टेट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील आणि तिसऱ्या टप्प्यातील विजेते अंतिम टप्प्यातील विकसित भारत राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील. पहिला टप्पा २५ नोव्हेंबर २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत भारत सरकारच्या MyGov पोर्टलवर आयोजित केला जाईल.

नेहरू युवा केंद्रातर्फे आवाहन-
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तरुणांना राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ – विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वरील ४ टप्पे पूर्ण करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा तसेच mybharat.gov.in या पोर्टल वर भेट द्यावी असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.