Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्च रुग्णालयात ७ डिसेंबर रोजी पोटविकार ओपीडीचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  धानोरा तालुक्यातील  चातगाव स्थित सर्च रुग्णालयात नागपूर येथील प्रसिद्ध विशेषज्ञ  पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे आयोजित पोटविकार ओपीडी करीता दि. ७ डिसेंबर रोजी सर्च रुग्णालय, चातगाव येथे  येणार आहेत. सदर पोटविकार ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी,  एंडोस्कोपी  व फाईब्रोस्कॅन तपासणी करण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 फायब्रोस्कॅन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया असून ती  यकृताचे  मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. फायब्रोस्कॅन तपासणी यकृताची कडकपणा आणि लवचिकता मोजते, जे फायब्रोसिस आणि सिरोसिस सारख्या यकृत रोगांची उपस्थिती आणि तीव्रता याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करू शकते.  यकृताची स्थिती निर्धारित करण्यासाठी फायब्रोस्कॅन उपकरण कंपनाचा वेग मोजते. हिपॅटायटीस सी, यकृत रोग आणि अल्कोहोल-संबंधित यकृत रोग यासारख्या परिस्थिती असलेल्या रुग्णांमध्ये यकृताच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी सहसा वापरली जाते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच पचनसंस्थेशी निगडीत विकाराचे निदान करण्यासाठी एंडोस्कोपी  तपासणी द्वारे  उपचार केल्या जातील.  पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल,मळमळणे, आतड्या मधील सुज, पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, पोटात पाणी ही पोटविकाराची लक्षणे असू शकतात.
सर्च रुग्णालयात गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी  गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये  ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०%  सवलत प्रदान करित आहे. तसेच ज्या रुग्णांना तपासणी नंतर एंडोस्कोपी प्रोसीजर व  वेदना निवारण इंजेक्शनची (पेन ब्लॉक) आवश्यकता असेल त्यांना १००% मोफत प्रोसीजर  सेवा देण्यात येईल. तरी दिनांक ०७ डिसेंबर रोजी होणार्‍या  पोटविकार ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाचे वतीने  केले आहे. तसेच रुग्णालयात  येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.