Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलचां वर्धापन दिन उत्साहात साजरा

सुरजागड खाण परिसरातील दवाखाना ठरला वरदान..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 “लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल” मध्ये बाह्यरुग्ण विभागात ओपीडी सोमवार ते शनिवार, सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत,सुरू राहत असुन आपत्कालीन सेवा २४ तास उपलब्ध आहे.अतिरिक्त सेवा म्हणून ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा, ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील गर्भवती महिला यांना तपासणी व प्रसूती साठी मोफत ॲम्बुलन्स २४ तास सेवा. ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील कुपोषित मुले व मुली कुपोषणमुक्त बालक कार्यक्रम अंतर्गत हॉस्पिटलमध्ये उपचार व आहार पुरवठा. ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना सिकलसेल, एनेमिया, मलेरिया, हिवताप बाबत मोफत उपचार व मार्गदर्शन. सर्व गावामध्ये प्रथम उपचार पेटीद्वारे तात्काळ उपचार व माहिती देणे. गावातील महिला व किशोर वयातील मुली यांना सखी- सहेली कार्यक्रम अंतर्गत एकूण २२१६ मुली व महिला मोफत सनिटरी पेड वितरण करून जनजागृती करुन परिसरातील नागरीकांना निःशुल्क सेवा पोहोचल्या असल्याने “लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल” चर्चेत आले आहे.

गडचिरोली : दि. ०९ डिसेंबर,  एट्टापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलला ८ डिसेंबर रोजी एक वर्षपूर्ती पूर्ण झाल्याने वर्षपूर्ती सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आले असुन गोरगरीब आदिवासी नागरिकांसह लोह प्रकल्प परिसरातील नागरिकांना हॉस्पिटल मोठें वरदान ठरले आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी सारख्या सारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना कुठल्याही आजारावर उपचार करण्यासाठी शेकडो मैंल अंतर कापून हॉस्पिटल ला जावे लागायचे कधी उपचार व्हायचं तर कधी उपचार न मिळाल्याने कित्येकदा जीवास मुकावे लागले आहे. मात्र सुरजागड लाइट्स मेटल कडून नागरिकांच्यां आरोग्याचा हित लक्षात घेवून मां. बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड तसेच आयर्न आणि माइन्स सुरजागड यांच्या संकल्पनेतून सुरजागड लोह प्रकल्पाच्या माध्यातून ‘लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल’ निर्माण करून नागरीकांना निःशुल्क सेवा अविरत सुरू आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल’ येथे ३० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व व्यवस्थेने समृध्द असून समाजाच्या आरोग्यासाठी निर्माण होवुन अविरत सेवा देत असल्याने सर्वत्र वर्षपूर्ती निमित्त कौतुक होत आहे.

या हॉस्पिटल मध्ये आत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून विविध आरोग्यावर उपचार करणाऱ्या तज्ञ १२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ( प्रसुती), बालरोगतज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, जनरल सर्जन जनरल मेडिसिन, त्वचारोगतज्ज्ञ ,भूलतज्ज्ञ ,कान नाक, घसा विशेषज्ञ चिकित्सक, आहारतज्ञ, अतिदक्षता विभागात आयसीयू, बाह्यरुग्ण विभाग तसेच आंतररुग्ण विभाग उपलब्ध आहेत.

हॉस्पिटलची निर्मिती झाल्यापासून तज्ञ डॉक्टर मार्फत ४० हून अधिक रुग्ण उपचार हॉस्पिटलद्वारे घेतलेले आहेत. तर शेकडो गरोदर मातांचे यशस्वी प्रसूती सुसज्ज असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून हॉस्पिटलला वर्षपूर्ती झाल्यानें लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल चे मोठ्या थाटात वर्षपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यासोबत स्थानिक तीन ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि गाव पाटील यांना शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती अरुणताई सडमेक, सरपंच ग्रामपंचायत – पुरसलगोंडी. राकेश भाऊ कवडो उपसरपंच ग्रामपंचायत – पुरसलगोंडी, राजूभाऊ तिममा उपसरपंच ग्रामपंचायत, नागुलवाडी, कु. वनिताताई कोरामी सरपंच ग्रामपंचायत. तोडसा, श्री साई कुमार, भोलूभाऊ सोमनानी. संजय चांगलाणी, डॉ. चारंजितसिंग सलूजा, वेदांत जोशी, टी रोमित, टी.ए.भास्कर, राम कुमार, अरुण रावत, सुनीता मेहता, विक्रम मेहता, दुल्हत साहेब पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन हेडरी, डॉ. गोपाल रॉय, डॉ. चेतन बुरिवार, डॉ. प्रीती बुरिवार, श्री. कटिया तेलामी माजी उपसरपंच हेडरी.लालसाय तलांडे भूमीया सुरजागड, मधुकरजी सडमेक सदस्य ग्रामपंचायत – पुरसलगोंडी, माधव जी गावडे पोलीस पाटील नागुलवाडी , दस्साजी कोरामी पोलीस पाटील पेठा,.लालसुजी रापणजी पो. पा कारंपल्ली , बेंजामिन टोप्पो पोलीस पाटील मलमपाडी, .संजय जेट्टी पोलीस पाटील इतुलनार .दिनेश पुंगाटी पोलीस पाटील अलेंगा,श्री विनोद भाऊ नरोटी ग्रामपंचायत सदस्य तोडसा, देऊ पुंगाटी प्रतिष्ठित नागरिक कुदरी साधूजी गुंडरू भूमीया, झुरू कावडो प्रतिष्ठित नागरिक हेडरी ,.गोसुजी हिचामी पोलीस पाटील मंगेर,श्री. पेकाजी गुंडरू पोलीस पाटील बांडे ,श्री. बिरजू गावडे पोलीस पाटील बोडमेटा ,श्री.संभाजी गोटा पोलीस पाटील एकरा खुर्द, श्री. रैनु जी नरोटे पोलीस पाटील झारेवाडा,श्री.नितीन तोडेवर प्रतिष्ठित नागरिक ,
श्री.बाजू मट्टमी प्रतिष्ठित नागरिक बांडे,श्री.मुन्ना भाऊ पुंगाटी सरपंच ग्रामपंचायत पिपली बुर्गी, सौ.कल्पना आलम माजी सरपंच सुरजगड, श्री. झुरु मासु गोटा पो.पा बोडमेटा, श्री. देवजी पाटील कावडो गाव पाटील हेडरी, गोसुजी हिचामी गाव पाटील मंगर, श्री. लाचुजी पाटील हेडो गाव पाटील हलूर, श्री. साधू गुंडरु गाव पाटील बांडे, श्री. मंगू कलमोती हेडरी श्री. जुरु कावडो हेडरी, श्री. अशोक हिचामी मान्यवर नागरिक हेडरी गाव, श्री. बाजी गुंडरु,श्री. रामजी गुंडरु बांडे गावातील मान्यवर नागरिक. हा कार्यक्रम मान्यवर नागरिक, आणि लॉयड्स अधिकाऱ्यांच्या व परिसरातील जन समुदायाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Comments are closed.