Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जमीन मोजणी करण्याचा कालावधी घटला निम्म्याने; पण शुल्क वाढले दुपटीने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : जमीन मोजणीचा कालावधी व त्यासाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये मोठा बदल भूमी अभिलेख, विभागाकडून  करण्यात आलेला आहे. जमीन मोजणीचा कालावधी निम्म्याने घटविण्यात आला आहे, तर जमीन मोजणीच्या शुल्कात दुपटीने वाढ केलेली आहे.

यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणीचे काम लवकर होईल. मात्र, त्यासाठी  जमीन मालकाला अधिकचे पैसे मोजावे लागतील. जमीन मोजणीचा कालावधी घटविणे व मोजणीचे सुधारित दर लागू करण्यासाठी उपसंचालक, भूमी अभिलेख, संलग्न जमाबंदी आयुक्त (भूमापन) पुणे यांच्या वतीने १० ऑक्टोबर २०२४ रोजी परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार १ नोव्हेंबर २०२४ पासून जमीन मोजणीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानुसार क्षेत्रनिहाय जमीन मोजणीचे दर लागू करण्यात आलेले आहेत. शहरी भागासाठी ३००० हजार रुपये दर निश्वचित करण्यात आला तर ग्रामीण भागातील जमीन मोजणीसाठी २००० हजार रुपये  मोजणी शुल्क निश्चित केलेले आहेत. सुधारित पद्धतीमुळे जमीन मोजणी लवकर होईल, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या प्रभारी जिल्हा अधीक्षक नंदा आंबेकर यांनी दिली.

 

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.