Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आकाशात..मुक्तछंदपणे विहार करत पक्षी परतीच्या वाटेवर, 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :   भामरागड येथील पांढऱ्या शुभ्र व आकाराने छोट्या बगळ्यांचा थवा आकाशात गगनभरारी घेऊन मुक्तछंदपणे विहार करत परतीच्या वाटेवर,

भामरागड हा अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल तालुका आहे. येथे निसर्गाने  मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. या भागातील निसर्गसौंदर्य अधिक खुलून येत आहे. त्यामुळे वन्यजीवांसह पशू-पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यात पावसाळ्यात देश विदेशातील  स्थलांतरित पक्ष्यांचीही भर पडते. यामुळे या भागातील निसर्गसौंदर्य मुळे सदर भागात चिमण्या, कावळे, बगळे, पारवे आदी पक्षी आढळतात. त्यातील छोटे कबुतर आता आपापल्या भागात स्थलांतरित होत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या  भामरागड तालुक्यातील  निसर्गसौंदर्य मुळे पावसाळ्यात अनेक पक्षी येत असतात. चार-पाच महिने नाल्या, तलावांसह नद्यांमध्ये खळखळणाऱ्या पाण्यावर, घनदाट वृक्ष-वेलींवर रुंजी घालणारे पक्षी सध्या परतीच्या मार्गावर आहेत. भामरागड येथील पांढऱ्या शुभ्र व आकाराने छोट्या बगळ्यांचा थवा आकाशात गगनभरारी घेऊन मुक्तछंदपणे विहार करत आम्ही जातो आमुच्या गावा,  आम्ह्चा रामराम घ्यावा. या उक्तीप्रमाणे पक्षी आकाशात गगनभरारी घेऊन मुक्तछंदपणे विहार करत आहेत.

 

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.