बकरी फार्मवर छापा 41 लाख रुपये रोख रक्कम आणि 47 किलो गांजा जप्त
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातील मेमारी येथील घटना.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात पोलिसांनी मेमारी पोलीस ठाणे परिसरात एका घरावर छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 41 लाख रुपयांची कॅश आणि 47 किलोचा गांजा पकडला आहे. पोलिसांना एक गुप्त खबर मिळाली होती. त्या आधारे पोलिसंनी ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे बकरी फार्म हाऊसच्या नावाखाली हा धंदा सुरू होता. हा संपूर्ण प्रकार पाहून पोलीसही हादरून गेले.
पूर्व बर्धमान जिल्ह्यात बकरी फार्म हाऊसच्या खाली एक तहखाना होता. या ठिकाणी गुप्तपणे गांजा तस्करी सुरू होती. संपूर्ण माल या ठिकाणी ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या टीमने या तहखान्यात तीन तास सर्च ऑपरेशन केलं. पोलिसांना या कारवाईत गांजाच्या छोट्या पुड्या आणि मोठ्या पुड्यांसह एक किलोचं पॉकेटही मिळालं आहे. गांज्याची छोटी पुडी 50 रुपये आणि मोठी पुडी 100 रुपयांना विकली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Comments are closed.