अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी दारूच्या बॉटल फोडत अवैध दारू विक्रेत्याची चक्क झोपडी जाळून आपला रोष व्यक्त केला आहे. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथे ही घटना घडली आहे. हिवरा हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असून अवैद्य दारूविक्रेत्यांनी एका शेतात तळ ठोकला होता. त्यामुळे नागपूर पोलिस कारवाईसाठी आले की दारुविक्रेता चंद्रपूरच्या सीमेत यायचा आणि चंद्रपूर पोलिस आले तर तो नागपूर जिल्ह्यात पळून जायचा. यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याने हिवरा, साठगाव आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील त्रस्त महिलांनी याविरोधात मोर्चा उघडून त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून तो पेटवून दिला आहे.
या घटनेनंतर भिसी व भिवापूर पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून तीन हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेत आरोपी अशोक सगरे आणि स्वामी बुचलवार यांना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.
Comments are closed.