Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बचत गटiतील महिलांना मालकी हक्काचे धडे

देसाईगंज येथे शिबीराद्वारे प्रभावी जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  तेजोमय लोक संचालित गटसाधन केंद्र देसाईगंज यांच्च्या  वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन कार्यक्रमांतर्गत  स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण दि. २० डिसेंबर रोजी देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले.

सदर प्रशिक्षणात हिंदू विवाह कायदा व संपत्तीवरील मालकी हक्क, शेतीवरील मालकी हक्क, महिलांचे शिक्षण, पोटगी, स्त्रियांवर होणारे अन्याय- अत्याचार, स्वसंरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच महिला वरील विविध विषयांवर मार्गदर्शन गटसाधन केंद्राच्या सभागृहात करण्यात आले.  यादरम्यान बचत गटाच्या महिलांनी स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्काचे धडे सदर प्रशिक्षणातून घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर प्रशिक्षणा करिता अॅड. संजय गुरू, सामाजिक कार्यकर्ते अरविंद घुटके, अॅड. जुईली मेश्राम, अॅड. सुजाता, व्यवस्थापक कुंदा मामिडवार, उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,  महिलांच्या शिक्षणात जरी वाढ होत असली तरी बर्याच  महिला आपल्या हक्काच्या बाबतीत अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यांच्यातील  चूल आणि मूल ही संकल्पना कालबाह्य करण्यासाठी त्यांना जाणिवजागृतीची गरज आहे. स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क हा कायद्याने दिलेला अधिकार असताना याबाबत समाजात पाहिजे तेवढी जागृती झाली नाही. त्यामुळे बऱ्याच महिला आपल्या हक्कांपासून वंचित आहेत, असे अॅड. संजय गुरू यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजोमय महिला शेतकरी उत्पादक गटाच्या अध्यक्षा संगीता ठेंगरे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. जुईली मेश्राम, अॅड. सुजाता, व्यवस्थापक कुंदा मामिडवार, तलाठी आकाश चट्टे, माविमचे जिल्हा समन्वयक सचिन देवतळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंदा मामिडवार, व्यवस्थापक  यांनी केले तर संचालन अनिता चौधरी यांनी केले तर आभार आशा खरकाटे यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

राज्यातील १२ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या …

 

कुरखेड्यातील संस्कार बँक गैरव्यवहारातील आरोपी मोकळेच,..

 

अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी

 

Comments are closed.