Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जुनी पेन्शन योजना लागू करा

गोंडवाना विद्यापीठातील यंग टीचर्स संघटनेची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा  लाभ मिळावा  यासाठी गोंडवाना विद्यापीठातील यंग टीचर्स असोसिएशनकडून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी  यांना गोंडवाना विद्यापीठातील यंग टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी.यांनी भेटून  जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेमार्फत करण्यात आला आहे.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त बिगर नेट- सेट प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. तसेच  राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये १४ जून २००६ पूर्वी नियुक्त झालेल्या व ज्यांनी सेवेत असताना १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधीत एम.फिल. अर्हता धारण केली आहे, अशा नेट-सेट असलेल्या प्राध्यापकांना कॅशअंतर्गत पदोन्नतीचा लाभ, देण्यात अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने केली आहे.  तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदाची जाहिरात निघालेल्या  शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना सुद्धा  जुनी पेन्शन योजना लागू करावी,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठातील  यंग टीचर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर पदवीधर मतदार संघाचे  आमदार  सुधाकर अडबाले व संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या नेतृत्वात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची नागपूर भेट घेऊन निवेदन दिले असता  समस्यांच्या संदर्भात प्रधान सचिव यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झालेली. गोंडवाना विद्यापीठाचे  क्षेत्रात स्वतंत्र सहसंचालक कार्यालयाची निर्मिती करावी, समाजकार्य महाविद्यालयाची उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरण प्रक्रिया जलदगतीने करावी, शिक्षक कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयक त्वरित मंजूर करावे आदी मागण्या करण्यात  आल्या आहेत.

प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची नागपूर यांचे भेटी करिता आ. सुधाकर अडबाले, डॉ. प्रदीप घोरपडे, डॉ. विवेक गोरलावार, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. नत्थू वाढवे, डॉ. सुरेश खंगार, डॉ. अभय लाकडे, डॉ. एस. बी. किशोर, डॉ. प्रमोद बोधाने, डॉ. मनीष कायरकर, डॉ. नत्थू गिरडे आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

जिल्हयात धानाऐवजी मक्याचे पीकाला प्राधान्य !

आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.