सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे – आ विजय वडेट्टीवार
वाल्मिकी कराडला अजून अटक का होत नाही, वाल्मीक कराड सरकारचा जावई आहे का वडेट्टीवार यांचा सवाल परभणी मध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिस आक्रमक होती, बीडमध्ये कारवाई करताना आता पोलिसांच्या हाताला लकवा मारला आहे का? विजय वडेट्टीवार यांची टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : दि.२९ – सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही अशी मागणी आ.विजय वडेट्टीवार यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का असा सवाल आ. विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
महाराष्ट्रातील बीड मध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही ? परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा मारला आहे का, प्रश्न विचारत आ. विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर टीका केली.
संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही का ? याचा सूत्रधार वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे. आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हे ही वाचा,
Comments are closed.