नवीन वर्षात रासायनिक खतांचे दर पुन्हा महागणार ?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : केंद्र सरकारने खताच्या सबसिडीमध्ये घट केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून डीएपी या रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते २५० रुपयांची दरवाढ दरवाढ जाहीर केली आहे.
हवामाणातील बदलांमुळे आधीच शेतकरी हा आर्थिक अडचणीत आहे. प्रत्येक वस्तूमध्ये झालेल्या दरवाढीने मेटाकुळीस आलेला आहे. महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. याआधी डीएपी खत १३५० रुपये होते. तर नवीन दर १५९० घोषित केले त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते २५० रुपयांची दरवाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागणार असून शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे शेतमालाला मिळेना पुरेसा भाव मिळत नाही. तर दुसरीकडे केंद्र शासनाने रासायनिक खतांचे दर वाढणारअसल्याची घोषणा केल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरलेली आहे. आधीच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे तर दुसरीकडे मात्र रासायनिक खतांचे दर आधीच जास्त असतांना त्यात पुन्हा वाढ करून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. रासायनिक खतांचे दर वाढविले जात असताना शेतमालाला मात्र पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यात सरकारच्या विरोधात नाराजीचा सूर आहे.
हे ही वाचा,
ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..
मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरुद्ध होणार कडक कारवाई !
Comments are closed.