Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात ७५ अधिकृत सावकार,

सहा महिन्यांत दोन अवैध सावकारांवर झाली कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : राज्यातील सहकार विभागाकडून सावकारी करण्याकरिता शासनाकडून जिल्ह्यतील  जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून  सावकारी करिता अधिकृत परवाना देण्यात  येतो.

जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून  जिल्ह्यातील संपूर्ण वैध सावकाराच्या व्यवहारावर त्यांची  देखरेख असते. अधिकृत सावकारांना शासनाच्या नियमानुसार कर्जदारांना कर्ज पुरवठा करता  येते. त्यामध्ये बिगर कृषी व इतर कर्जदारांना सुद्धा कर्ज देता येते. त्यांचे संपूर्ण दस्तावेज, पावत्या ह्या नियमितपणे सहकार विभागाकडे  तपासणीस  सादर करावे लागतात. सदरचे  कागदपत्रात   किंवा व्यवहारात अनियमितता आढळल्यास उपनिबंधक कार्यालयाकडून संबंधित सावकारावर गुन्हा दाखल करून  कारवाई केली जाते. त्याकरिता अशा सावकारांची व व्यवहाराची नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक यांचेकडे तक्रार करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सद्ध्या जिल्हयात ७५ अधिकृत सावकार असून  गेल्या तीन महिन्यांत दोन नवीन सावकाराची अधिकृत नोंदणी झालेली आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील  दोन अवैध सावकारांवर सहकार  विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच काही भागात सहकार विभागाकडे कुठलीही नोंद नसताना काही श्रीमंत लोकांनी अवैध सावकारकीचा व्यवसाय  सुरू केलेला आहे. त्यांनी  सोने, चांदी, प्लाटचे  व घरांचे दस्तावेज घेऊन स्टम्प  पेपरवर लिहून हे सावकार कर्ज पुरवठा करतात. वेळप्रसंगी त्यांचेकडून जास्त व्याजाने पैसे घेतात.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

दक्षिण गडचिरोलीत गांजा, तंबाखू तस्करी ?

आरोपीच्या मागे सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस,

 

Comments are closed.