बंधाऱ्यामुळे जमीन येणार ओलिताखाली
वैलोचना नदीवर सव्वा कोटीच्या बंधारा बांधकाम , मे अखेर होणार पूर्ण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील वैरागड जवळील वैलोचना नदीवर राज्याच्या जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाने नदीपात्रात बंधारे बांधण्याची नावीन्यपूर्ण मोहीम सरकारने हाती घेतली असून या बंधाऱ्यामुळे वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जलभरण होऊन परिसरात सिंचनाची सोय होणार आहे.
बंधाऱ्यामुळे परिसरात सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी साठवता येऊन त्याचा शेती सिंचनासाठी उपयोग होणारआहे. वैरागड जवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर १.२५ कोटी रुपये निधीतून बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले.असून या बंधाऱ्यामुळे परिसरातील शंभर एकर जमीन सिंचनाखाली येणार असून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन सोय होणार आहे. मे २०२५ अखेरपर्यंत काम पूर्ण होणार आहे. शिवाय गुरे जनावरे व उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी हा बंधारा उपयुक्त ठरणार आहे. सदर बंधारा जास्त उंचीचा राहणार असून पाणी अडवण्यासाठी लोखंडी पत्र्याचे दरवाजे बनवले जाणार आहेत. एका नदी काठावरून दुसऱ्या नदी काठावर आवागमनसुद्धा करता येणार आहे. त्यामुळे या नावीन्यपूर्ण बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून आता नदीपात्रातील जलसाठ्यात देखील वाढ होणार आहे.
हे ही वाचा,
Comments are closed.