Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : रब्बी हंगामातील तूर हे महत्वाचे पिक आहे. आपल्या जेवणातील मह्र्वाचे असे  डाळीचे मह्र्व आहे. त्याशिवाय आपले जेवण रुचकर बनत नाही.

सध्या तूर पीक पूर्णतः फुलोऱ्यावर असून, बऱ्याच ठिकाणी शेंगा लागून दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून आद्र व दमट हवामान, तसेच ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक ठरले. यामुळे नुकसानीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी तूर पिकाची पाहणी करून वेळीच उपाययोजना केल्यास शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखता येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्रावर तुर पिकाची  लागवड करण्यात आलेली आहे. तुरीचे  पीक हे  शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्यात येते. सध्या हलक्या जातीच्या  तुरीच्या शेंगा भरत आहेत, तर अधिक मुदतीच्या तुरी फुलोराचे अवस्थेत आहेत. फुलोऱ्याचे स्थितीत तुरीवर किडीचा धोका जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पिकावरील अळीचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी पिकाची पाहणी करून लक्षणे ओळखल्यानंतर लगेच  कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करावी.

हे ही वाचा, 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन

कत्तलीसाठी नेणाऱ्या ११६ गोवंशाची केली सुटका !

रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !

Comments are closed.