Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘एचएमपीव्ही’ विषाणू हा सामान्य आजार भीती नको, दक्षता बाळगा

आरोग्य विभागाचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू असून नागरिकांनी त्याची भिती न बाळागता या संसर्गापासून बचावासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन, आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
एचएमपीव्ही श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा हंगामी रोग असून हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातील सामन्यत: आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे उद्भवतो. सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढले, अशा बातम्या येत आहेत. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढील सुचानाचे पालन करावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काय करावे : 1. खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. 2. साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा. 3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. 4. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. 5. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेटीलेषण) होईल, याची दक्षता घ्या.
काय करू नये : 1. हस्तांदोलन, 2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, 3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क, 4. डोळे,नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. 5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. 6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध(सेल्फ मेडिकेशन)घेणे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.