Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२२ जोडप्याचा एकत्र विवाह,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

देसाईगंज : मुस्लीम समाज कमिटी देसाईगंजच्या वतीने ८ जानेवारी बुधवारला दुपारी २ वाजता मुस्लीम समुदाय सामूहिक विवाह सोहळा शहरातील मदिना मस्जिद ग्राऊंड कमलानगर येथे उत्साहात पार पडला. मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम सुरु असून आतापर्यंत येथील सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण ३४३ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आला आहे. या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत आहे.

सदर मेळाव्यात एकूण २२ मुस्लीम जोडपी विवाहबद्ध झाली. सन २०११ पासून सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबविला जात आहे. कोरोना कालावधीतील दोन वर्षे वगळता दरवर्षी मुस्लीम समाजाच्या वतीने हा आदर्श उपक्रम देसाईगंज शहरात राबविण्यात येत आहे. सामूहिक विवाह सोहळा इस्लामिक पद्धतीने पार पडला. शहरातील विविध मस्जिदमधील इमाम मोहम्मद अशफाक रजा, मौलाना कफील अहमद नूरी, हाफीज इरफान रजा यांच्या वतीने कार्यवाही लग्न विधी पार पाडण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देसाईगंजच्या सोहळ्यात मुस्लिम जोडप्यांचा निकाह लावून देण्यात आला. नसरुद्दीन, मोहम्मद जहीर आलम, कारी खान, माजी नगरसेवक आबीद अली आदी उपस्थित होते. विवाह सोहळा कमिटीच्या वतीने नवविवाहित दाम्पत्यांना जीवनावश्यक वस्तू आंदण म्हणून देण्यात आल्या.

दरम्यान आमदार रामदास मसराम,  परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भास्कर डांगे यांनी भेट देत नवविवाहित दाम्पत्याना आशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैसर जमाल शेख यांनी केले, प्रास्ताविक करून आभार बशीर अहेमद पटेल यांनी मानले.    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे सचिव फैज खान, हाजी निसार अहमद मजीद खान, हाजी शरीफ खान, हाजी राशीदूल हक जावेद कुरेशी, हाजी रियाज खान, मकसूद खान, राजीक खान, तसेच मुस्लीम समाज बांधवांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने केली आत्महत्या;

*ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड*

अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.