Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

INDW vs IREW : भारतीय महिलांनी सर्वात मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

भारतीय महिलांनी टीम एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. भारतीय महिलांनी टीम हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिलांनी टीमने आयर्लंड वूमन्सचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 304 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने आयर्लंडला 436 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला 31.4 ओव्हरमध्ये 131 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने या विजयासह आयर्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं.

भारतीय महिला क्रिकेट संघाने 304 धावांनी आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विक्रमी विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी शतकी खेळी केली. तसेच, गोलंदाजीवेळी दीप्ती शर्मा हिने आयर्लंडच्या संघाचे तीन गडी बाद केले. या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.