Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इस्राईलमध्ये सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी

संकेतस्थळावर नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे घरगुती सहायक या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असून युवकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या २५ ते ४५ वर्षे वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवाराकडे (घरगुती सहायक) सेवांसाठी पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण, तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बी.एस्सी नर्सिंग, पोस्ट बी. एस्ससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इस्राईलला नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी
https://maharashtrainternational. com या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहिती साठी जिल्हा कौशल्य, विकास रोजगार व उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे सपंर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य, विकास रोजगार व उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, यांनी केले आहे.

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मितीची बातमी ‘फेक’

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.