Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाग होणार टीव्ही, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन, जाणून घ्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

कंपन्या लवकरच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या किंमती २० टक्क्यांनी वाढू शकतात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 12 डिसेंबर:- टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. कारण यानंतर सर्वांच्या किंमती वाढणार आहेत. या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यां किंमती वाढवण्याच्या विचारात आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जगभरातील तुटवड्यामुळे टीव्ही पॅनलच्या किंमती ३० ते १०० टक्क्यांनी वाढल्यायत. भारतीय बाजारपेठांवर याचा परिणाम लवकरच दिसून येईल. पुढच्या तिमाहीत या वाढलेल्या किंमतींचा परिणाम दिसेल असं कंपन्यांना वाटतंय. सणासुदीत जास्त मागणी असल्याने कंपन्यांनी ही वाढ थांबवून ठेवली होती.

कंपन्या लवकरच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या किंमती २० टक्क्यांनी वाढू शकतात. कंपन्यांना कॉपर, झिंक, स्टिल, प्लास्टिक आणि एल्यूमिनियम सारखा कच्चा माल महाग पडतोय. समुद्री मार्गाचा माल भाडे ४० ते ५० टक्क्यांनी वाढलंय. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वॉशिंग मशीन आणि एसीच्या किंमती ८ ते १० टक्क्यांनी वाढतील. फ्रिजच्या किंमती १२ ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. टीव्हीचे दर देखील साईजप्रमाणे ७ ते २० टक्क्यांनी वाढतील. किंमती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची ही वेळ अनेक वर्षांनी पहील्यांदा आलीय.

सर्व उत्पादनांच्या किंमती वेगाने वाढत आहेत. फेस्टिव्ह सिझनमधील स्टॉक आता संपल्यानंतर वाढलेल्या किंमतीचा भर कंपन्या ग्राहकांवर टाकण्यासाठी तयार आहेत. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातील किंमती वाढण्यास सुरुवात होईल असे Godrej Appliances चे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी सांगितले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.