Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंगणघाट जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

प्रसिद्ध विधितज्ञ उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

वर्धा, दि. 13 डिसेंबर: राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळितकांड प्रकरणाच्या सुनावणीला उद्या सोमवार 14 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून निकम हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी येणार असल्याने अनेकांमध्ये या खटल्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या प्राध्यापक असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते. गुन्हेगार विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात आहे. जळीतकांडानंतर राज्यभरात निर्माण झालेला रोष पाहता सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यात खटला निकाली काढून आरोपीला शिक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती. पोलिसांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर अवघ्या 25 दिवसांत 28 फेब्रुवारीला न्यायालयात 426 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा खटला चालवण्यासाठी वर्ध्यात जलदगती न्यायालय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज मंजूर न झाल्याने याप्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथे पार पडणार आहे. हिंगणघाटच्या श्रीमती आशा कुणावार महिला महाविद्यालयात प्राध्यापक युवती 3 फेब्रुवारीला सकाळी दारोडा येथून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसून असलेल्या विकीने पेट्रोल तिच्यावर टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ती 40 टक्के जळाली. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.