Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहरात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली – गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. यामध्ये नुकतेच अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले प्रेक्षागृह तसेच मामा तलावाचे सौंदर्यीकरण व केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा यांचा समावेश होता.

पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, तसेच बांधकाम विभागाचे अभियंता अंकुश भालेराव उपस्थित होते. त्यांनी संबंधित प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रेक्षागृह

जिल्ह्यात ७५० आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहाच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात २७.५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शालेय विद्यार्थी, रंगकर्मी आणि झाडीपट्टी कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महत्वपूर्ण बाबींसाठी संकुल परिसरात नाट्यगृह उभारण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मामा तलावाचे सौंदर्यीकरण

शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाच्या मामा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये खाऊगल्ल्यांची निर्मिती, फुलझाडांची लागवड, आकर्षक फूटपाथ, सजावटीचे दिवे, बाके, फिरण्यासाठी ट्रॅक आणि प्रवेशद्वार यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पंडा यांनी या कामाची पाहणी करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

 

केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा

गडचिरोली शहरात मंजूर असलेल्या केंद्रीय विद्यालयाचे बांधकाम लवकर सुरू करण्याबाबत विद्यालयाच्या पथकासोबत चर्चा झाली आहे. मात्र तोपर्यंत केंद्रीय विद्यालय इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याच्या अनुषंगाने जागेची पाहणी करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.