Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुसूचित जाती व नवबौध्द गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी थेट अर्थसहाय्य : योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २३ मे : अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी शासनाने एक दिलासादायक पाऊल उचलले असून, मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी थेट बँक खात्यात आर्थिक अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात सुधारित शासन निर्णय निर्गमित केला आहे.

आतापर्यंत वस्तू स्वरूपात दिला जाणारा लाभ आता थेट निधीच्या स्वरूपात गटाच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून, अनुदानाची कमाल मर्यादा ₹३.१५ लाखांपर्यंत असणार आहे. हे खाते गटाचे अधिकृत खाते असून ते गटप्रमुख व सचिव यांच्या आधार क्रमांकास संलग्न असणे बंधनकारक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गटाच्या रचनेवर भर : सामाजिक समावेशाची अट..

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे. गटाचे अध्यक्ष आणि सचिव हेही त्याच सामाजिक घटकांतून असावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत, ही देखील आवश्यक अट आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतकऱ्यांना दिलासा : ट्रॅक्टर खरेदीला शासकीय मान्यता आणि प्रशिक्षण अनिवार्य..

बचत गटांनी खरेदी करावयाचे यंत्र भारत सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत यादीतील उत्पादकांकडूनच असावे लागेल. ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असून, अर्थसहाय्य प्राप्त केल्यानंतर ट्रॅक्टर व उपसाधने गहाण ठेवता वा विकता येणार नाहीत.

यासाठी बचत गटाने १० वर्षे हमीपत्र सादर करावे लागेल. याआधी पावर टिलर अथवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेले गट नव्याने लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत.

गडचिरोलीतील गटांना आवाहन..

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३११६१६८ या क्रमांकावर संपर्क करता येईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.