हत्तींसह संघर्षावर तातडीची पावले : जलद कृती दल, ‘अलर्ट सिस्टीम’ व ग्राम समित्यांचा प्रस्ताव – जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
लोकस्पर्श न्यूज ने सर्वात आधी वेधले होते लक्ष..हत्तीच्या बातमी ची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार गडचिरोली : गडचिरोलीत २५ मे च्या रात्री रविवारी शहरात पहिल्यांदाच हत्ती रात्रीच्या वेळी गडचिरोली-लांजेडा मुख्य मार्गवर टस्कर हत्तींचा मुक्त संचार करीत असल्याची घटना घडली असून.नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झाले होते. काहीनी या प्रकाराचे मोबाईल व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले होते अशी बातमी लोकस्पर्श न्यूज लावली होती. सुदैवाने या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यापुढे अशी वेळ येऊ नये यासाठी मानव-हत्ती संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजनांचा आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेत, जलद कृती दल अधिक सक्षम करणं, मोबाईल अलर्ट सिस्टीम विकसित करणं, वस्ती परिसरात टेहळणी व्यवस्था आणि ग्रामस्तरावरील समित्यांमार्फत नियंत्रण व्यवस्था उभारणं – अशा बहुआयामी उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी आज दिले.
हत्तींच्या हालचालींवर स्मार्ट अलर्ट – कॉलर ID व ‘अलर्ट ॲप’चा प्रस्ताव..
हत्तींच्या हालचाली नागरी वस्तीच्या ५ किमी परिसरात आल्या की, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तात्काळ अलर्ट जाण्यासाठी मोबाईल ॲप व सिस्टीम तयार करण्याचे आदेश देण्यात आले. हत्तींच्या गळ्यात रेडिओ कॉलर ID लावण्याची तसेच टेहळणीसाठी बुरुज (Watch Tower) उभारून सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची कल्पनाही बैठकीत मांडण्यात आली.
गावागावात नियंत्रण समित्या – माहिती देणं अनिवार्य..
प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, महसूल व वनविभागाचे अधिकारी यांच्या सहभागातून ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून त्यांना स्पष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. हत्ती दिसताच १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणं ही या समित्यांची प्राथमिक जबाबदारी ठरणार आहे.
हत्तींबाबत वर्तन – ‘गर्दी नको, फोटोबाजी नको’ – जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन…
टस्कर हत्ती आक्रमक व अतिशय वेगवान असतात. त्यामुळे हत्ती दिसला तरी त्याच्या आसपास गर्दी करणं, फोटो काढणं, पळापळ करणे – हे टाळावं, असं स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अविष्यांत
पंडा यांनी नागरिकांना केलं.
समन्वयातून सशक्त उपाययोजना – SOP तयार करण्याचे निर्देश..
वनविभाग, महसूल, पोलीस, कृषी आणि इतर संबंधित यंत्रणांनी परस्पर संयुक्त मानक कार्यपद्धती (SOP) तयार करावी. या SOP मध्ये ग्राम समित्यांची स्पष्ट भूमिका नमूद करावी, असे आदेश देण्यात आले. हत्ती रस्ते ओलांडत असताना वाहतूक थांबवणं, नुकसान भरपाई देताना पोलीस यंत्रणेला सहभागी करणं, ही SOP मधील प्रमुख बाबी असतील.
मुख्य उपाययोजना थोडक्यात –
प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना हत्तींच्या हालचालीसाठी मोबाईल अलर्ट सिस्टीम टोल फ्री नंबर १९२६ कार्यरत ठेवणे रेडिओ कॉलरिंग, टेहळणी बुरुज, सुरक्षारक्षकांची नेमणूक
अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना आखणे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम
“नागरिक सहभागी झाले तरच यंत्रणा प्रभावी” – जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा…
प्रशासनाच्या सर्व यंत्रणांना एकत्र आणून स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही, हे जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी अधोरेखित केलं.
Comments are closed.