Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली येथील युवक-युवती मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप करीता पुणे येथे रवाना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आशादायी संधी निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” उपक्रमांतर्गत आज, 10 जून 2025 रोजी 29 युवक-युवतींना टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. या उपक्रमाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

क्विज विनिंग टुगेदर कंपनी व टाटा मोटर्स कंपनी यांचा सहकार्याने 29 युवक-युवतींना उपक्रमाचा लाभ

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दल, क्विज विनिंग टुगेदर कंपनी व टाटा मोटर्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. योजनेमध्ये भाग घेणाऱ्या युवक-युवतींना तीन वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यात त्यांना स्टायफंडसुद्धा दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, या युवक-युवतींना टाटा मोटर्स कंपनीमध्ये नोकरी मिळवून दिली जाईल.

गरजू आदिवासी युवक-युवतींना रोजगाराची संधी…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यातील गरजू आदिवासी युवक-युवतींना औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम त्यांच्या जीवनमानात महत्वपूर्ण बदल घडवू शकतो. प्रकल्पाच्या माध्यमातून, गडचिरोली पोलीस दलाने 8103 युवक-युवतींना रोजगार आणि 5614 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले आहे.

पोलीस दलाने दिलेले विविध प्रशिक्षण..

आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यशाळांचा आयोजन केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली यांच्या स्किलींग इन्स्टिट्यूटद्वारे 120 वेब डेव्हलपर, 120 सॉफ्टवेअर डेवलपर, 1564 ड्रायव्हग प्रशिक्षणार्थी, 208 कराटे प्रशिक्षार्थी, 300 एस.पी.सी. व 1700 पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यशस्वी उपक्रमासाठी अथक परिश्रम..

या यशस्वी उपक्रमासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.

गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींच्या भविष्याची दिशा बदलण्याची आणि त्यांना उज्ज्वल करिअर मिळवण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

Comments are closed.