गुरु म्हणजे जीवनाचा उजेड!
गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा ज्ञानदीपाला नतमस्तक, तुमच्या गुरुंसाठी ‘हे’ खास संदेश आहेतच पुरेसे...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
गुरु हा शब्द उच्चारताच आपल्या मनात उभा राहतो एक असा दिव्य चेहरा, ज्याच्या कृपाछायेखाली आपलं जीवन आकार घेतं, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करतं आणि अज्ञानातून सत्याच्या गाभ्याकडे पोहचतं, गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे केवळ परंपरेचा एक भाग नसून तो आपल्या आयुष्यातल्या त्या प्रत्येक गुरूला स्मरण करून त्यांच्या ऋणात झुकण्याचा, नम्रतेने त्यांच्या चरणांवर मन अर्पण करण्याचा पवित्र दिवस आहे, संस्कृतीत गुरुचं स्थान देवाहूनही मोठं मानलं गेलंय कारण माता-पिता जन्म देतात, पण गुरु जीवन घडवतो, विचार देतो, मार्ग दाखवतो आणि आपल्याला स्वतःचं अस्तित्व ओळखायला शिकवतो, म्हणूनच ‘गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः’ ही केवळ श्लोकांची ओळ नाही तर त्यामागे दडलेलं आहे जीवनाचं संपूर्ण सार, २०२५ मधील गुरुपौर्णिमा आज १० जुलै रोजी साजरी केली जाणार आहे . म्हणून याच दिवशी आपल्या गुरुंच्या पायांशी नतमस्तक होणं, त्यांच्या वचनांची आठवण करणं आणि एक दिलखुलास ‘धन्यवाद’ व्यक्त करणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्यच आहे, गुरुपौर्णिमा ही केवळ आरती-प्रसादात अडकलेली नाही तर ती आपल्या अंतःकरणात खोलवर जागवलेली कृतज्ञतेची भावना आहे, ही भावना शब्दांत पकडता येत नाही, पण तरीही आम्ही तुमच्यासाठी खास अशा १० शुभेच्छा आणि १० प्रेरणादायी संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या गुरुंना व्हॉट्सॲपवर, कार्ड्समध्ये किंवा मनातल्या मनातही अर्पण करू शकता.
गुरूंचं मार्गदर्शन म्हणजे आयुष्याला मिळालेला खराखुरा दिशा निर्देश, गुरुंचं प्रत्येक शब्द म्हणजे अनुभवातून आलेली अमूल्य ग्रंथसंपदा, आजच्या सोशल मीडियाच्या युगातही गुरूंचं स्थान अजूनही ‘लाइक्स’ किंवा ‘शेअर्स’च्या पलीकडचं आहे, कारण एक गुरु जो जेव्हा ‘जग’ दाखवतो, तेव्हा आपण स्वतःलाही शोधायला शिकतो, म्हणूनच या गुरुपौर्णिमेला तुम्ही फक्त औपचारिक शुभेच्छा देऊ नका तर आपल्या गुरुंचं अस्तित्व ‘का’ महत्त्वाचं आहे, हे शब्दबद्ध करून पाठवा, एक ओळ, एक आठवण, एक अनुभव त्यांना अर्पण करा कारण गुरूंच्या आठवणीतलं ‘धन्यवाद’ हेच खरं गुरुपौर्णिमेचं गारुड असतं, आणि म्हणूनच आजचा हा दिवस तुमच्या मनातल्या गुरुच्या पायांवर नतमस्तक होण्यासाठी, त्यांच्या शिकवणीतल्या प्रत्येक वाक्याला पुनः एकदा आठवणीतून जगण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक यशाच्या मागे उभ्या असलेल्या त्या एक हाताला ‘प्रणाम’ करण्यासाठी आहे –गुरुपौर्णिमा 2025 च्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Comments are closed.