Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘आयर्न वुमन’च्या हातात ट्रकची चावी: गडचिरोलीत महिलांच्या नवभारताची सुरुवात

‘आयर्न वुमन’चा आत्मनिर्भर होऊन गडचिरोलीच्या रस्त्यावर नवा प्रवासाचा इतिहास रचणार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली (कोनसरी): एलएमईएल आणि व्होल्वो ट्रक्स इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू झालेल्या ‘आयर्न वुमन’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आदिवासी महिलांना एलएनजीवर चालणाऱ्या अवजड ट्रक चालविण्यासाठी प्रशिक्षित करून औद्योगिक लॉजिस्टिक्समध्ये थेट सहभागी करून घेण्याचा क्रांतिकारी प्रयोग सुरू करण्यात आला आहे. यानुसार, नऊ एलएनजी ट्रक गडचिरोलीच्या कोनसरी येथून खनिज पेलेट घेऊन रवाना करण्यात आले असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पहिल्या खेपेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, “गडचिरोलीतील माझ्या बहिणी आज केवळ ट्रक चालवत नाहीत, तर सामाजिक परिवर्तनाच्या चालक ठरत आहेत. हाऊसकीपिंगपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज आत्मनिर्भरतेच्या उंचीवर पोहोचला आहे. १२,००० रुपयांवरील पगाराची मर्यादा पार करत त्या आता ५५,००० रुपयांपर्यंत मजल मारत आहेत.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपक्रमासाठी एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, व्होल्वो ट्रक्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष बोद्दपती दिनकर, सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि आमदार डॉ. परिणय फुके यांची उपस्थिती होती.

बी. प्रभाकरन यांनी सामाजिक समावेशाला व्यावसायिक प्रगतीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा एलएमईएलचा निर्धार स्पष्ट केला. बोद्दपती दिनकर यांनी ‘आयर्न वुमन’ उपक्रमातून महिलांना केवळ वाहनचालक नव्हे, तर नवभारताच्या शाश्वत लॉजिस्टिक्स क्रांतीचा भाग बनवले जात असल्याचे नमूद केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘आयर्न वुमन’ हा उपक्रम महिलांना खाण क्षेत्रातील समावेशक आणि व्यावसायिक भूमिका बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, संधी आणि आत्मविश्वास देतो. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात महिलांचा ट्रकच्या चाकावरचा हा आत्मनिर्भर प्रवास केवळ त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा नाही, तर तो जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक पुनर्रचनेचा कणा ठरू लागला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.