Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वैनगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह कोनसरी प्लांटजवळ आढळला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या कोनसरी येथील प्लांटजवळ गुरुवारी (२५ जुलै) दुपारी सुमारे १२.३० वाजता एक अज्ञात पुरुष मृतावस्थेत आढळून आला. नदीच्या पुराच्या प्रवाहात वाहून आलेल्या या इसमाचे प्रेत हॅड्रॉन प्लांटजवळ सापडल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिस स्टेशनचे निरीक्षक विशाल काळे यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. सदर मृत इसमाचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे दरम्यान असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची माहिती तहसील प्रशासनालाही देण्यात आली असून, नायब तहसीलदार राऊत व त्यांच्या पथकाने देखील घटनास्थळी भेट दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मृत्यूबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. मृत इसम नेमका कोण होता, तो कुठून वाहून आला, याचा शोध पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.