Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था द्वारा करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा: जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्ष पायल मशाखेत्री व सचिव आशिष मशाखेत्री यांनी विद्यार्थ्यांना आजच्या जागतिक रोजगार क्षेत्रातील स्पर्धा, उद्योजकतेच्या संधी आणि कौशल्यविकासाच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा चे निर्देशक शुभम देशपांडे यांनी स्किल रूट अंतर्गत चालू असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत फायदे स्पष्ट करत विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांमध्ये गुण मिळवणे हाच उद्देश न ठेवता स्वतःमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांसमोर एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित झाला की ग्रामीण भागातील युवकांनी शहरांमध्ये धाव घेतल्याशिवाय प्रगती होणार नाही, ही समजूत चुकीची आहे. आज कौशल्याधारित शिक्षणामुळे ग्रामीण भागातही उद्योजकता, नवे व्यवसाय, रोजगार निर्मिती आणि स्थानिक पातळीवर करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांची तिहेरी भागीदारी महत्त्वाची ठरत असल्याचे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले.

विशेष म्हणजे, अकरावी व बारावीतील विद्यार्थी हा करिअर निवडीचा टप्पा गाठत असताना अशा कार्यक्रमांची सर्वाधिक गरज असते. केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहिल्यास बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र होते; पण कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि बदलत्या काळाशी सुसंगत असे करिअर ते घडवू शकतात, असा विश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरजुसे सर, बुरमवार सर, पठाण सर व दरडे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण पातळीवर होत असलेल्या अशा उपक्रमांमुळे शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख विचारसरणी रुजविण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होत असल्याचे शिक्षक-पालक व उपस्थितांनी मत व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.