Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कसनसूर सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करा; नागरिकांचे माजी मंत्री अंब्रीशराव राजेंना निवेदन – काम पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कसनसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या ३३ केव्ही सब-स्टेशनचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून लघुउद्योगांपर्यंत सर्वत्र होत असलेला फटका लक्षात घेऊन हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली.

गेल्या अनेक वर्षांपूर्वी शासनाने ३३ केव्ही सब-स्टेशनला मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही. परिणामी कसनसूर क्षेत्रातील तब्बल ७० गावांतील नागरिकांना अस्थिर वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतीतील पिकांना पाणी देण्यात अडथळे येत आहेत, तर घरगुती वापर, विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि लघुउद्योग ठप्प होण्याची वेळ आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवेदन स्वीकारताना राजेंनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व संबंधित वीज वितरण विभागाशी तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने संपर्क साधून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी कसनसूर ग्रामपंचायत सरपंच सौ. कमलताई हेडो, जवेली बुर्ज सरपंच कु. अलिशाताई गोटा, वाघेझरी सरपंच विलास कोंदामे, जवेली खुर्द सरपंच मुन्ना पुंगाटी, महादेवपदा (कोटमी) उपसरपंच सादु कोरामी, घोटसुर सरपंच सिंदू मोहोंदा, मानेवारा उपसरपंच देविदास मटामी, वेनहरा ईलाखा सल्लागार प्रकाश पुंगाटी, ईलाखा सचिव राजू गोमाडी यांच्यासह विकास झोरे, पुसू गावडे, मैनू लेकामी, बेबी हेडो, बेबी कन्नलवार, दमाजी नारोटे, बाबुराव पुंगाटी, देऊ गावडे, गंगाराम इष्टाम, सुधाकर गोटा, लालसू नरोटे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.