Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य सेवेत ‘जनरल ड्युटी असिस्टंट’ प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे मंजूर ‘जनरल ड्युटी असिस्टंट’ (General Duty Assistant) या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती 11 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत रुग्णालय प्रशिक्षण केंद्रात पार पडणार आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. शैक्षणिक पात्रतेत दहावी उत्तीर्ण किंवा नापास वरील शिक्षण आवश्यक आहे. उमेदवाराने तीन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्ण करण्यास सक्षम असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाव नोंदणी करताना उमेदवारांनी आपल्या मुळ कागदपत्रांसह (आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र तसेच कौशल्य विकास योजनेअंतर्गत नोंदणी केलेले कार्ड) प्रत्यक्ष उपस्थित राहावे. ही प्रक्रिया रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, सा.रु. गडचिरोली येथेच पार पडणार असून, नोंदणीची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे.

या प्रशिक्षणाद्वारे आरोग्य क्षेत्रात रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न असून, ग्रामीण भागातील युवकांना वैद्यकीय सेवांशी निगडित व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्याची ही उत्तम संधी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.