Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुधमाळात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; नव्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली :प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दुधमाळा गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रीय सण उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा दुधमाळा, पल्लवी विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य चौक, सोसायटी चौक आणि पाटील चौक येथे ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा दुधमाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.ग्रामपंचायत दुधमाळा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थ्यांचे कवायत, मनोरे व लेझीम नृत्य घेण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवायत, मनोरे रचना आणि लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक बांधिलकी, शिक्षणाचे महत्त्व आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याच प्रसंगी ग्रामपंचायत भवनाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले. दुधमाळा गावावर विशेष प्रेम असल्याने भाजपा जिल्हा सचिव मा. सारंगजी साळवे यांनी ग्रामपंचायत भवनाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करत हे काम मंजूर करून आणले होते. यापूर्वी त्यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले होते, तर प्रजासत्ताक दिनी त्यांच्या हस्तेच लोकार्पण करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्यास गट विकास अधिकारी, ग्रामसचिव, शाळेचे मुख्याध्यापक, भाजपा जिल्हा सचिव मा. सारंगजी साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोदजी लेनगुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू जिवानी, सरपंच मायाताई उसेंडी, उपसरपंच यशवंत मोहुर्ले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेशजी उईके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे संचालन बारसिंगे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन काळे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा, ग्रामपंचायत, गावातील युवक, महिला आणि सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.