Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण,६८ लाखांचे होते बक्षीस..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी लढ्यात मोठं यश मिळालं आहे. 11 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर आत्मसमर्पण केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये डिव्हिजनल कमिटी मेंबर, एरिया कमिटी सचिव, कमांडर आणि एसीएम पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे.या सर्व माओवाद्यांवर मिळून तब्बल 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, 2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद चळवळीला मोठा धक्का बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.आज 19 मार्च रोजी 11 माओवाद्यांनी अधिकृतपणे आत्मसमर्पण केलं…यामध्ये एक डिव्हीसीएम, एक एरिया कमिटी सचिव, एक पीपीसीएम, एक कमांडर आणि एक एसीएम यांसारख्या वरिष्ठ पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे…या माओवाद्यांवर मिळून 68 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं…

पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त कारवाईमुळे आणि शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे ही प्रक्रिया गतीमान झाल्याचं सांगितलं जात आहे…

गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं चित्र आहे…2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवली आहेत. आत्मसमर्पणानंतर संबंधित माओवाद्यांना शासनाकडून पुनर्वसन आणि आर्थिक मदत देण्याची तरतूद असून पुन्हा असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसाचा मार्ग बंद करून सन्मानाने जगण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.